Friday, December 27, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रिचार्जसाठी रोख अनुदान...

पिंपरी चिंचवड : ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रिचार्जसाठी रोख अनुदान देण्याची डीवायएफआयची मागणी

पुणे : ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मासिक इंटरनेट रिचार्जसाठी रोख अनुदान देण्याची मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) ने महापौर उषाताई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून शाळा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या शाळांमध्ये हजारो गरीब विद्यार्थी आहेत. २०२० पासून शहरात कोरोनामुळे त्यांच्या पालकांच्या आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत. घरेलू कामगार, विधवा, अपंग, रिक्षाचालक आणि रोजंदारी नागरिकाना घरभाडे भरणे जड जात आहे. तसेच एप्रिल पासून सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन आणि तुटपुंजी मदत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च याचा सारासार विचार करून आयुक्त आणि महापौर यांनी ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान २ जीबी दरदिवसाचा इंटरनेट डेटा कॉल सह ५०० रु अनुदान तीन महिन्यासाठी शाळा सुरू होईपर्यंत द्यावे, अशी मागणी डीवायएफआयने केली आहे.

या निवेदनावर अमिन शेख, स्वप्निल जेवळे, सचिन देसा, पावसु कऱ्हे, गौरव पानवलकर, अमोल जगताप आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय