पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१९- रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिम्मित रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एच. ए.-पिंपरी येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे व व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सर्व पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र ,समता, बंधुता या तत्वावर आपले राज्य उभा केले.त्यांनी कधीही इतर धर्माचा द्वेष केला नाही.आपल्याला आपला देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपल्याला देखील महाराजांच्या विचारांचा अंगिकार करणे गरजेचे आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,प्रदेश प्रवक्ते विक्रांत शेळके,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप,पश्चिम महाराष्ट्र सचिव समाधान गायकवाड,प्रमोद लोंढे, शमशोद्दिनगाझी शेख, करणं शिंदे इ.उपस्थित होते.