Home ताज्या बातम्या PCMC : शिवतेज नगर येथे महिला दिन साजरा

PCMC : शिवतेज नगर येथे महिला दिन साजरा

PCMC : Women's Day celebration at Shivtej Nagar

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ आणि कै.सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ लेखिका व कवी प्रा.डॉ.प्रतिमा इंगोले यांचे  ” शहरी व ग्रामीण स्त्रीचे अंतरंग” या विषयावर व्याख्यान झाले.
शहरी भागातील महिलांचे जीवन सुखकर असले तरी ग्रामीण महिलांना दैनंदिन जीवनामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते,या ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण शहरी महिलांनी केले पाहिजे,
या वंचित महिलांचा सन्मान करावा,त्यांना गरजेच्या वेळी दानधर्म करावा,असे आवाहन डॉ .प्रतिमा इंगोले यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे,अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविकामध्ये  जागतिक महिला दिन कधी व कसा सुरू झाला याची पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचा दहा वर्षाचा आढावा घेतला. माजी नगरसेवक कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानच्या वतीने घरकुल येथील मोहिनी शिराळकर यांना ” कर्तुत्वान महिला 2024 ” या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने उपस्थित सर्वमहिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. नारायण  बहिरवाडे यांनी मनोगत व्यक्त करताना स्त्रियांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अखंड स्मरण करावे, कारण त्यांच्यामुळेच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटत आहे.असे सांगीतले.

कार्यक्रमाचे अध्यक्षा पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वृषाली मरळ शासकीय योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर केल्या कार्यक्रमाचे संयोजन स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.हरि नारायण शेळके  यांनी केले,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सारिका रिकामे यांनी केले. शिंदे काकू यांनी आभार मानले.

Exit mobile version