Wednesday, December 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अजित गव्हाणे यांच्यासोबत विजयाचा संकल्प घेऊन हजारो नागरिकांची पदयात्रा!

PCMC : अजित गव्हाणे यांच्यासोबत विजयाचा संकल्प घेऊन हजारो नागरिकांची पदयात्रा!

चिखलीत पदयात्रेला तुफान प्रतिसाद; युवकांची लक्षणीय उपस्थिती (PCMC)

भोसरी विधानसभेच्या विकासासाठी चिखली ग्रामस्थ अजित गव्हाणे यांना साथ देणार

महाविकास आघाडीचे वातावरण तापलंय; तुतारीचे प्रचार गीत हृदयाला भिडतंय..!


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, शेकाप व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी चिखली परिसरात काढलेल्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी नागरिकांनी केलेली गर्दी, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी आणि गव्हाणे यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि परिवर्तनाचा एकच नारा देत हजारो नागरिक उत्स्फूर्त प्रतिसादात पदयात्रेत सहभागी झाले. या नागरिकांच्या गर्दीने परिवर्तनाचा नारा दिला आणि भोसरी विधानसभेत बदल घडवायचा असे चित्र या पदयात्रेत दिसून आले. (PCMC)

टाळगाव चिखली कमानी पासून पदयात्रेला सुरुवात झाली. अजित गव्हाणे यांनी सर्वप्रथम गणेश मंदिरामध्ये श्रींचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पदयात्रेत सहभागी झाले. या पदयात्रेत महिला तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ महिलांनी औक्षण करीत, अजित गव्हाणे यांना विजयासाठी आशीर्वाद दिला. नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने अजित गव्हाणे भारावून गेले होते. तर अनेक युवकांच्या पाठिंबातून महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे अशा भावना अजित गव्हाणे यांनी व्यक्त केल्या.


या पदयात्रेत माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, माजी सरपंच काळूराम सोपान यादव, गणपत आहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य पंडित नाना मोरे, हभप रोहिदास शंकरराव मोरे, संजय नेवाळे, स्वाती साने, विकास साने, यश साने, प्रदीप आहेर, विशाल आहेर, युवराज पवार, वैभव मोरे, सोमनाथ मोरे, बंडूशेठ मोरे, संदीप नेवाळे, राजाभाऊ सोनवणे ,अमृता सोनवणे, जेष्ठ नागरिक गुलाबराव सोनवणे, तसेच सुनंदा रोकडे ,गुलाबराव पालघरे, सदाशिव अण्णा नेवाळे, तुषार आहेर, शिवाजी मोरे, सतीश मोरे, एकनाथ नाना मोरे, तृप्ती मोरे, शैलेजा मोरे, प्रीती मोरे, अनिता मोरे, कोमल मोरे, सारिका ओवाळ, मंदा ओव्हाळ, जया गवळी, शिवा मोरे, बाळू नेवाळे, गीताराम मोरे, बबू लांडगे, संतोष जाधव, विशाल परांडे, विष्णु पाटील, आदींचा सहभाग होता.


सकाळी साडेनऊच्या सुमारास चिखलीतील गणपती मंदिराजवळ अजित गव्हाणे यांचे आगमन होतात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह नोंद घेण्यासारखा होता. गणपती मंदिरापासून पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी विविध सोसायटींमधून नागरिकांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा पुढे सरकत होती.

चिखली गावठानातून श्री राजे सोसायटी पासून महादेव नगर , गणेश कॉलनी गल्ली नंबर 2 तेथूनसुखकर्ता कॉलनी, दुर्गानगर, रामदासनगर पासून वळून पाटील नगर ते भांगरे कॉलनी पदयात्रेदरम्यान अजित गव्हाणे यांनी नागरिकांशी संवाद साधला. देहू आळंदी रोड सीएनजी पंपापर्यंत व तेथून ओंकार लॉन्स सीएनजी पंप पासून , शेलार वस्ती, सोनवणे वस्ती व मोरे वस्ती मध्ये यांच्या पदयात्रेचा झंझावात आज पाहायला मिळाला. (PCMC)

‘स्मॉल क्लस्टर’साठी प्रयत्न

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात शेजारची चिखली सारखी उपनगरे महत्त्वाची भूमिका बजावतात. या भागांमध्ये लघुउद्योग आहेत. त्यामुळे रस्ते, वीज या सुविधा प्रामुख्याने या भागाला पुरवणे गरजेचे आहे. याशिवाय या भागातील पाण्याची समस्या देखील मोठी आहे. आगामी काळात या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहेच. मुख्य म्हणजे लघुउद्योगांना पोषक ठरेल असे ‘स्मॉल क्लस्टर’ येथे तयार करण्याचा प्रयत्न असेल. आजच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकजण विजयाचा संकल्प घेऊन आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

घुमू दे…शरद पवार यांची तुतारी…!

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आजच्या पदयात्रेत राष्ट्रवादीच्या प्रचार गीताने चांगलाच रंग भरल्याचे दिसून आले. अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वातावरण भोसरी मतदारसंघांमध्ये चांगले तापले आहे. नागरिकांची गर्दी आणि राष्ट्रवादीचे प्रचार गीत यांनी आजच्या पदयात्रेत चांगलाच रंग भरला. “घुमू दे तुतारी… पवार साहेबांची तुतारी” या प्रचार गीताने अक्षरशः नागरिकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित लेख

लोकप्रिय