संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केला आहे – सचिन चिखले PCMC
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. pcmc
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहाराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. त्यांची विधाने समाजात तेढ निर्माण करणारी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कारण त्यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केला आहे. MNS
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवार, २९ मे) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरात मनूस्मृती दहन करत आंदोलन केलं होते. यावेळी, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विरोधकांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया देत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला. आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. आव्हाडांवर कडक कारवाई करून अटकेची मागणी करण्यात आली.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले (Sachin Chikhale), रुपेश पटेकर, के.के. काबळे, नितीन चव्हाण, प्रविण माळी, सखाराम मटकर, नारायण पठारे, आकाश सागरे, रोहन काबळे, मामु शेख, रोहीदास शिवणेकर, गणेश वाघमारे, शिशिर महाबळेश्वर , आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक