Friday, January 3, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्वरसागर महोत्सवाचे ग. दि. माडगूळकर सभागृहात मंगळवारी भव्य उद्घाटन

PCMC : स्वरसागर महोत्सवाचे ग. दि. माडगूळकर सभागृहात मंगळवारी भव्य उद्घाटन

मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्राचे आयोजन (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती व दिवाळीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन च्या वतीने २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. (PCMC)

तत्पूर्वी सोमवारी (दि.४ नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात सायंकाळी ५ वाजता, ‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वरसागर महोत्सवाच्या ग. दि. माडगूळकर येथील मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन, श्रद्धा शिंदे – हर्डीकर यांचा कथक नृत्याविष्कार होणार आहे. बुधवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजता स्नेहल सोमण यांचे सामूहिक नृत्यरंग, डॉ. शर्वरी डीग्रजकर – पोफळे यांचे शास्त्रीय गायन, स्वरस्वप्न – व्हायोलिन समूह वादन हे कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी (दि. ७) समारोपाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता, पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकाचे मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य सादर होईल. तसेच डॉ. सुमेधा गाडेकर यांची ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ ही नृत्यनाटिका, मिलिंद ओक व राहुल सोलापूरकर यांचा निशे प्रस्तुत ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाने स्वरसागर महोत्सवाची सांगता होणार आहे.

तत्पूर्वी, सोमवारी सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात आयोजित केलेल्या ‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जेष्ठभाषा तज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवनी आदी सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन राजन लाखे हे करणार आहेत. (PCMC)

हे सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहेत अशीही माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय