पिंपरी चिंचवड : चिखली घरकुल वसाहती मधील सकल मराठा बांधवानी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी रविवारी (दि.29) रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मेन गेट ते भाजी मंडई पर्यंत कॅन्डल मोर्चाचे आयोजन केले.
घरकुल मधील सर्व रस्ते मराठा समाज बांधवांनी गजबजून गेले होते सर्वत्र भगवेमय वातावरण तयार झाले होते. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कॅन्डल मार्च शांततेमध्ये पार पडला.
या आंदोलनास घरकुल मधील सर्व सामाजिक संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.