गुजरातचे आमदार राकेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बुथ सक्षमीकरणावर देणार भर (PCMC)
भाजपच्या माध्यमातून चिंचवडमध्ये झालेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना
रहाटणी – सांगवी मंडलातील शक्ति केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज
पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयासाठी मतदारसंघातील प्रत्येक बुथच्या सक्षमीकरणावर भर द्या. प्रत्येक बुथवर ५१ टक्केपेक्षा जास्त मतदान मिळविण्यासाठी कामाला लागा. तसेच ज्या बुथवर मतदानाचा टक्का कमी आहे त्या बूथवर अधिक मतदान कसे होईल यावर भर द्या, अशा सूचना गुजरातचे आमदार राकेश शहा यांनी दिल्या. (PCMC)
पिंपळे गुरव, महालक्ष्मी लॉन्स याठिकाणी भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयाची रणनीती ठरविण्यासाठी रहाटणी – सांगवी मंडलातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत स्व. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अश्विनी जगताप व शंकर जगताप यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेली विकासकामे त्याचबरोबर केंद्र सरकार आणि महायुती सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या जनधन योजना, लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान आवास योजना, श्रावण बाळ योजना, पीएम किसान निधी योजना, संजय गांधी निराधार योजना या विविध लोककल्याणकारी योजना मतदारांसमोर मांडण्याच्या सूचना यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्याना करण्यात आल्या. (PCMC)
या बैठकीला रहाटणी – सांगवी मंडल अध्यक्ष संदीप नखाते, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, राहुल जवळकर, गणेश नखाते, सखाराम रेडकर, दीपक जाधव, नरेश खुळे, सूर्यकांत गोफणे, संजय भोसले, विशाल माळी, अमर आदियाल, सुरेश तावरे, रमेश काशीद, रमेश जगताप, दीपक काशीद, शशिकांत दुधारे, स्वाती जाधव, नरेश जगताप, शिवाजी कदम, सारंग लोखंडे, आशिष जाधव, परिमल कडलग, राजू लोखंडे, स्वप्नील जाधव, प्रकाश लोखंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित