८० व्या अभिष्टचिंतन सोहोळ्यात प्रतिपादन PCMC
पिंपरी चिंचवड : देशात धार्मिक, जातीय अस्मितांचे राजकारण करून जातीव्यवस्थेला टिकवण्याचे व धार्मिक द्वेषाला खतपाणी घालण्याचे काम भांडवली पक्ष करत आहेत.
कामगार-कष्टकरी आणि समृद्ध मध्यमवर्गाच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. संविधानातील किमान कल्याणकारी राज्याची संकल्पना कार्पोरेट केंद्री आर्थिक विकासामुळे मोडीत निघाली आहे.
देशात बहुसंख्य असलेली तरुणाई बेरोजगारीने ग्रासली आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रात कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात सुरू होऊनही जातीचा अंगरखा चढवून, आरक्षणाची नवनवीन मृगजळे निर्माण करून आणि अस्मितांच्या आगी पेटवून जनतेच्या असंतोषाला वेगळ्या दिशेने नेले जात आहे. असे मत जेष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ .सुरेश बेरी ( Suresh Beri) यांनी ८० व्या वाढदिवस अभिष्टचिंतन समारंभात व्यक्त केले. pcmc

युवा शक्तीचे वैचारिक प्रबोधन केले पाहिजे.
आपल्या समोरच्या आर्थिक समस्या, शैक्षणिक समस्या, बेरोजगारी याची कारणे कोणती? याचा अभ्यास, विचार तरुणवर्ग करत नाही, त्यासाठी युवा शक्तीचे वैचारिक प्रबोधन केले पाहिजे.
देशातील राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा स्तर खालावला आहे, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा प्रभाव ओसरला आहे, राजकीय नेत्यांची भाषणे असंस्कृत आणि सार्वजनिक सभ्य संस्कृतीला तिलांजली देत आहेत. तरुण कामगार, विद्यार्थी, युवक वर्गाने अस्मितांच्या जंजाळातून स्वत:ची सुटका करत, सृजनशील कामगार वर्गीय राजकीय-सांस्कृतिक पर्याय निर्माण केला पाहिजे, असे जेष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ.सुरेश बेरी यांनी आवाहन केले. PCMC NEWS
डॉ. सुरेश बेरी यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम चऱ्होली येथे (दि.११ मे) आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
देशात समाजवादी विचारधारा आणि समृद्ध लोकशाही साठी तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा मोठे राजकीय सामाजिक अराजक निर्माण होईल, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या उत्कर्षासाठी तरुणांनी पुन्हा एकदा कम्युनिस्ट विचार समजून घ्यावेत, असे आवाहन डॉ. सुरेश बेरी यांनी केले.
डॉ.सुरेश बेरी यांनी 1971 साली आकुर्डी येथे मार्क्सवादी विचाराने कामगार वस्त्यांमध्ये विविध नागरी प्रश्नावर लोकांना संघटित करून रहिवासी व भाडेकरू यांच्या संघटना स्थापन केल्या.
त्यानंतर त्यांनी एमआयडीसी मधील कामगारांच्या किमान वेतनाच्या मागणी साठी तरुण कामगारांचे लढे उभारले.
१९९० पर्यंत त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहरात नेतृत्व केले, सीटू कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ५० हून जास्त कामगार युनिट्स स्थापन करून कामगारांच्या आर्थिक मागण्याचे लढे यशस्वी केले. त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात १९८० ते १९९० च्या दशकातील कामगार चळवळीत मोठे योगदान दिले आहे. आकुर्डी मुख्य केंद्र असलेल्या कामगार वस्तीत माकपचे ऑफिस त्यांनी सुरू केले. त्यांनी तरुणांना संघटित करून डी वाय एफ आय या लढाऊ युवा संघटनेची स्थापना करून लाल बावट्याचा विचार शहरात रुजवला. PCMC NEWS


या शुभेच्छा समारंभात श्रुती बेरी, स्मिता रिंगे, गिरीश रिंगे, लक्ष्मीबाई खांडभोर, डॉ. प्रेरणा बेरी – कालेकर, ऊर्जा कालेकर, मेघना बेरी, भावीन भंडारी या नातेवाईक मंडळी सह कामगार, युवक कार्यकर्त्यांसह जेष्ठ कामगार नेते सलीम सय्यद, ऍड. मनिषा महाजन, ऍड. रमेश महाजन, क्रांतीकुमार कडुलकर, शैलजा कडुलकर, सचिन देसाई, स्वप्निल जेवळे, सुधीर मुरुडकर, राम नलावडे, गोकुळ बंगाळ, बाळासाहेब घस्ते आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा :
Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात
POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर
मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले
Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू
बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक
अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित
Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?