पिंपरी चिंचवड : शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा विचार अंगीकारून त्यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. (PCMC)
वूई टूगेदर फाउंडेशन कायमच असे विविध लोकपयोगी व गरजूंना निस्वार्थी मदतीचा हात देणारे उपक्रम घेत असतात. (PCMC) जे जे शक्य होईल ते ते करण्याचा प्रामानिक प्रयत्न असतो तो पुढेही कायम राहील आम्ही सर्व मान्यवर एक कुटुंब म्हणून कायम एकीने निस्वार्थी काम करीत असतो अशा भावना व्यक्त करीत वूई टूगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
संस्थेचे सल्लागर रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, जयंत कुलकर्णी, यांनी आपले विचार व्यक्त केले. आजच्या दिवशी फाउंडेशनच्या वतीने बाराही महिने नवीन, जुन्या सायकल संकलन करून गरजू विद्यार्थी किंवा होतकरू मुलांना मोफत सायकल वाटप उपक्रम घ्यायचा संकल्प केला आहे. (PCMC) फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे सह सचिव मंगला डोळे – सपकाळे, नंदकुमार वाडेकर, आदींनी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले. तर मेट्रोपोलिटिन सोसायटीने काही सायकली उपलब्ध करून दिल्या. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)
यासाठी सलीम सय्यद, मंगळा डोळे सपकाळे, रवींद्र सागडे, क्रांतीकुमार कडुलकर, शंकरराव कुलकर्णी, अर्जुन पाटोळे, नंदकुमार वाडेकर, दिलीप चक्रे, श्रीनिवास जोशी, विलास गटने, जयंत कुलकर्णी, सदाशिव गुरव, मच्छिन्द्र थोरवे, अर्चना बच्चे, श्रावणी बच्चे, यश डोळे, खुशाल दुसाने, रोहिणी बच्चे, आदिनी या उपक्रमात पुढाकार घेतला. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)
समीर सोनकांबळे, आयुष महाडीक, यशवंत जाधव, टिळकराज धुमाळ, संतोष गायकवाड, सतीश गायकवाड आदी विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्य स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. (हेही वाचा – ‘घरात घुसून मारू, गाडी बॉम्बने उडवू’ अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी)
त्यावेळी सह सचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार दिलीप चक्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)