पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : बदलापूर प्रकरण शांत होत नाही तोच पुण्यामध्ये गेल्या आठ दिवसात सलग 3 ते 4 बलात्काराच्या घटना घडल्या असून अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आहेत. (PCMC)
तर मागील सहा महिन्यात पुण्यामध्ये रोज एक घटना असा धक्कादायक रिपोर्ट बाहेर आला आहे.
शिक्रापूर अल्पवयीन प्रकरण त्यानंतर वाडिया कॉलेज प्रकरण, वानवडी मध्ये स्कुल बस मधील अत्याचार प्रकरण आणि आता कोंढवा परिसरातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण असे दिवसाला एक घटना पुण्यासारख्या विद्येचे माहेर असलेल्या आणि सुशिक्षित शहरात घडताना दिसत असून असे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी केली आहे.
पुणे सारख्या शहरामध्ये महिला, मुली या सुरक्षित नसून त्यांनी कोणाच्या भरवशावर घराच्या बाहेर पडावे असा प्रश्न उभा राहिला आहे. तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवून पैसे देण्यापेक्षा आपली लाडकी बहिणीच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करावी, पैशा पेक्षा सुरक्षा ही आजच्या काळाची गरज असून याकडे सरकारने जातीने लक्ष देऊन उपाययोजना करायला हवी.
तर काही प्रकरणात मानव अधिकार संघटनेला बदनाम करण्याचा नराधमांनी प्रयत्न केला असून यावर पोलिसांनी सक्त कारवाई करणे गरजेचे आहे.
बलात्कार रोखण्यासाठी पोलीस, पालक, महिला यांनी सहभाग घेऊन काम करणे गरजेचे आहे. पोलिसांनी योग्य ती उपाययोजना राबवून जनतेला सहकार्य करावे अशी मागणी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी केली असून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा पदाधिकारी लवकरच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना भेटणार असल्याचे सांगितले. (PCMC)
महिला सक्षमीकरण करण्यासाठी फक्त कायदा मोठा करून किंवा कायद्याचा धाक दाखवून चालणार नाही, कारण नराधमांना कायद्याची भीतीच नसल्याने अशी प्रकरणे घडत आहेत, म्हणून पोलिसांनी सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन जर काम केले तर नक्कीच होणारे अत्याचार थांबवू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नागरिक सतर्क करणे, महिला व मुलींना स्वसंरक्षण चे प्रशिक्षण देणे, समाजामध्ये जागरूकता पसरवणे, अध्यात्मची साथ घेऊन मानसिक आरोग्य सुधारणे आशा अनेक संकल्पना जर वापरल्या तर रोज होणारे बलात्कार आपण थांबवू शकतो आणि समाजामध्ये शांतता व सुरक्षितता आणु शकतो असेही किशोर थोरात यांनी सांगितले. (PCMC)
वरील काही उपाय योजना पोलीस आणि नागरिक, महिला संघटना, सामाजिक संस्था एकत्र येऊन कराव्या लागतील तर पोलिसांनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे व यासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेचे सर्व पदाधिकारी पुढे येऊन काम करतील अशी ग्वाही संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी दिली.
हा महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असून एक मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे आणि तो सोडविणे हा प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून आमच्या संस्थेबरोबर काम करून सामान्य नागिरांनी एकत्र आले तर लवकरच प्रश्न मार्गी लागेल असे किशोर थोरात यांनी सांगितले.
आपण सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेबरोबर जोडले जाऊ शकता आणि महिला व मुलींच्या संरक्षण, सक्षमीकरण साठी आपला सहभाग नोंदवू शकता, तर सर्वांनी संस्थेबरोबर जोडण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे व आमच्या बरोबर जोडण्यासाठी 8796824682 या क्रमांकावर कॉल किंवा व्हाट्स अँप करून पुढील माहिती घेऊ शकता.
चला तर सर्वांनी मिळून काम करूया, महिला मुलीवरील आळा घालूया. असे आवाहन किशोर थोरात यांनी केले आहे.