Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्याचे आदेश : निरिक्षक सुधांशु राय

PCMC : उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्याचे आदेश : निरिक्षक सुधांशु राय

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.18 – भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह मधील लेख्यांची तपासणी या तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैंनदिन खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यात येत असते.

त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक खर्च विषयक कामकाजासाठी कक्षातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी वहित नमून्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदी अदयावत ठेवा असे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षक सुधांशु राय यांनी दिले.

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या (maval loksabha 2024) निवडणूक खर्चाविषयी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून सुधांशु राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी आकुर्डी पुणे (pcmc) येथील पीएमआरडीए प्रशासकीय भवनातील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवुन कामकाजाची माहिती घेतली.

त्यावेळी राय बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षाची माहिती यावेळी राय यांना दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्म्त खराडे, पुणे जिल्हा निवडणूक खर्च देखरेख पथक पुणे पदमश्री तळदेकर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या निवडणूक खर्च तपासणी पथक प्रमुख अश्विनी मुसळे , निवडणूक निरिक्षक समन्वय कक्षाचे प्रमुख प्रमोद ओभासे, समन्वय सुरेंद्र देशमुखे, सचिन चाटे आदि उपस्थित होते. pcmc news

सुधांशु राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष, एक खिडकी कक्ष, आचार संहिता कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, ‍कायदा व सुव्यवस्था कक्ष, टपाली मतदान कक्ष अशा विविध कक्षामध्ये प्रत्यक्ष भेट देवून येथील कामकाजाची माहिती घेतली.

त्यानंतर मावळ, उरण, कर्जत, पनवेल,पिंपरी , चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यां समवेत आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले. निवडणूक खर्चाची नोंद योग्य पध्दतीने घेवून प्रत्येक नोंदी अदयावत ठेवाव्या, बॅकाकडून प्राप्त झालेल्या तपशीलाची माहिती संकलीत करावी विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वीत ठेवून प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करावी अशा सूचना राय यांनी यावेळी दिल्या. pcmc news

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय