Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि इंडो थाई न्यूज चॅनल यांच्या मध्ये...

PCMC : पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि इंडो थाई न्यूज चॅनल यांच्या मध्ये सामंजस्य करार

थायलंड मधील उद्योग विश्व अभ्यासण्याची पीसीईटी आणि पीसीयूच्या विद्यार्थ्यांना संधी – पवन मिश्रा (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : थायलंडने कृषी, पर्यटन आणि उद्योग, सेवा उद्योगांमध्ये खूप प्रगती साधली आहे. इंडो थाई न्यूज चॅनलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) विद्यार्थ्यांना थायलंड मधील उद्योग संबंध आणि रोजगार संधी बाबत माहिती मिळेल. (PCMC)

हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन इंडो थाई न्यूज चॅनलचे सीईओ आणि इंडो थाई चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन मिश्रा यांनी केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि इंडो थाई न्यूज चॅनेल यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार विद्यापीठाच्या नवी दिल्लीतील विभागीय कार्यालयात करण्यात आला.

यावेळी आसामचे खासदार कृपानाथ मल्लाह, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. रोहित पांडे, कायदे सल्लागार ॲड. पीटर फर्नांडिस, ज्येष्ठ पत्रकार आणि पीसीईटीचे माध्यम सल्लागार डॉ. राजेंद्र वाघमारे, हाँगकाँग मधील प्रसिद्ध उद्योगपती लिओ चॅन, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मिश्रा व डॉ. देसाई यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

इंडिया – थाई चेंबर ऑफ कॉमर्स (आयटीसीसी) ही थाई आणि भारतीय सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्था आहे. हा सामंजस्य करार नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि माध्यम संधींना चालना देण्याच्या उद्देशाने एका भागीदारीची सुरुवात करतो. (PCMC)

यामुळे इंटर्नशिप आणि जागतिक शैक्षणिक संस्था, व्यक्ती यांच्या बरोबर आंतरराष्ट्रीय संधींसह पीसीयुच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव ही मिळेल. पीसीयु स्कूल ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन्समधील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी, प्रत्यक्ष अनुभव आणि वास्तविक जीवनातील केस स्टडी अभ्यासाद्वारे त्यांना मीडिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल माहिती मिळेल, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले. (PCMC)

हॉंगकॉंग मधील प्रसिद्ध उद्योगपती लिओ चॅन यांनी पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

त्यांनी डॉ. गिरीश देसाई यांना पीसीयुसाठी उद्योग विनिमय संधी शोधण्यासाठी हाँगकाँगला आमंत्रित केले. तसेच पीसीईटी आणि पीसीयुच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. (PCMC)

ॲड. रोहित पांडे यांनी पीसीयुमध्ये कायदे विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिथी व्याख्याने आणि वास्तविक जीवनातील केस स्टडीज बाबत मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संबंधित लेख

लोकप्रिय