Dehradun : डेहराडून शहरात दारू विक्रेत्यांकडून जास्तीच्या दराने दारू विक्री आणि अनियमिततेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
सातत्याने तक्रारी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी सविन बन्सल यांनी स्वतः परिस्थितीची पडताळणी करण्याचे ठरवले. त्यांनी कोणताही स्टाफ न घेता, सामान्य ग्राहकाप्रमाणे दारू खरेदी करण्यासाठी एका दुकानात भेट दिली. यावेळी त्यांनी McDowell’s ची एक बाटली विकत घेतली, ज्याची किंमत ६६० रुपये होती. मात्र, दुकानदाराने त्यांच्याकडून ६८० रुपये घेतले, ज्यामुळे या गैरप्रकाराची खात्री पटली.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि उपजिल्हाधिकारी हरी गिरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील दारू विक्रेत्यांवर छापेमारी करण्यात आली. छाप्यांदरम्यान, चुना भट्टा येथील दारू दुकानात जास्त दराने विक्री होत असल्याचे आढळले. एका ग्राहकाला २०० रुपयांच्या बिअरची बाटली २१० रुपयांना विकली जात असल्याचे आढळले.
तपासणीदरम्यान, दुकानात रेट कार्ड योग्य ठिकाणी न लावल्याचेही स्पष्ट झाले. यानंतर, दुकान व्यवस्थापकाने चूक झाल्याची कबुली दिली आणि पुढे असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन दिले.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईत ओल्ड मसुरी रोडवरील दुकानाला ५० हजार रुपयांचा, चुना भट्टा येथील दुकानाला ७५ हजार रुपयांचा, सर्वे चौक आणि जाखन येथील दुकानांना प्रत्येकी ७५ आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईनंतर शहरातील इतर दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
Dehradun
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी