पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : नवी सांगवी, पिंपळे गुरव मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा संस्था या दोन्ही संस्था प्रभात फेरी काढून अंध, अपंग अनाथश्रमांना दरवर्षी कपडे, जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ देत असते, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे या उदात्य भावनेतून आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी यावेळी सांगितले, जोगदंड म्हणाले की प्रभातफेरी मध्ये आम्ही ताशा वाजवतो आणि स्पीकरद्धारे तसेच कवीनी आपल्या आपल्या कविता सादर करून नागरिकांना मदतीचे आव्हान करत होते यामुळे नागरिक आवाज ऐकल्याबरोबर नागरिक बाहेर येऊन मदत करतात.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष व साहित्यिक सुरेश कंक म्हणाले कि, आमचे सर्व कार्यकर्ते आठ दिवस आधी पत्रक घरोघरी जाऊन देतात त्यानंतर आठ दिवसांनी फेरी काढतो यामुळे नागरिक कपडे, धान्य व इतर आपल्याकडील जीवनाश्यक वस्तू करून व्यवस्थित बांधून पँक करून ठेवतात असे दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सांगितले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/0a754036-8e82-4ca9-af14-4fff5f167531-1024x461.jpeg)
यावेळी आम्ही आदिवासी पहाडी भागातील वाड्या वस्त्यावर आदिवासी बांधवाकडे स्वतः जाऊन मदत करणार असल्याचे सांगितले. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आम्हाला नागरिकांनी एक टेम्पो भरून धान्य, कपडे, यामध्ये जवळपास 600 साडया नवीन नागरिकांनी तसेच 15 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू मिळाल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड व सुरेश कंक यांनी सांगितले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, सुभाष चव्हाण, महिला अध्यक्षा संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्ष मित्र अरुण पवार, सामाजिक कार्यकर्ते नरेश जगताप माजीनगरसेवक सागर अंघोळकर, अंबरनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमित पसरणीकर, राजू पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी मदत केली या सामाजिक उपक्रमात गुणवंत कामगार, काळुराम लांडगे, तानाजी एकोडे, दत्तात्रय असरकर, विकास शहाणे, प्रकाश वीर, शंकर नाणेकर, शामराव सरकाळे, प्रताप देवडकर, कैलास भैरट, आण्णा गुरव, सरोजा एकोंडे, ह.भ.प अशोक गोरे, हनमंत पंडीत, महेंद्र गायकवाड यांनी सहभाग नोंदवला.