Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : जे आर डी टाटा उड्डाणपुलाची देखभाल व दुरुस्ती लवकरात लवकर...

PCMC : जे आर डी टाटा उड्डाणपुलाची देखभाल व दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी

विशाल जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पिंपरी चिंचवड शहर यांची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर, (दि.०२) : जमशेठजी टाटा उड्डाणपुल नाशिकफाटाची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेल यांच्यामार्फत आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब शिंदे, संतोष माळी, विशाल क्षीरसागर, सुहास कुदळे, प्रतीक बगाडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात विशाल जाधव यांनी म्हटले आहे की, नाशिक फाटा येथील जमशेठजी टाटा उड्डाणपुलाच्या भिंतींवर नैसर्गिकरित्या वड पिंपळ अशा झाडांचे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वेळोवेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दैनंदिन देखभाल दुरुस्ती केली जात नाही.भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडांचे मुळे वाढत असलेले दिसून येत आहे भविष्यात त्यामुळे पुलाला तडे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

लवकरात लवकर सदर कारवाई केली नाही तर येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष  विशाल जाधव यांनी दिला. निवेदनाला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी संबंधित विभागाला तातडीने  कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले.

Exit mobile version