भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
महापालिका प्रशासनाकडून शिल्पाचे काम प्रगतीपथावर
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : बैलगाडा शर्यत आणि शेती, माती, संस्कृती, प्रति प्रचंड आग्रही असलेले भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरीत शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प बैलगाडा शर्यतप्रेमी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. PCMC NEWS
भोसरी विधानसभा मतदार संघातील (Bhosari Vidhan sabha) आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र व भोसरी गावजत्रा मैदान परिसरात येथे ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे काम हाती घेण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ७ येथील भोसरी स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी संकूल उभारण्यात आले आहे. तसेच, भोसरी (Bhosari) स्मशानभूमीचेही नूतनीकरण यापूर्वीच झाले आहे. PCMC NEWS
भोसरीतील गावजत्रा मैदान येथे महाराष्ट्रा संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेला परंपरागत बैलगाडा घाट आहे. महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत यासह कुस्तीसारख्या मर्दानी खेळाबाबत नव्या पिढीत जनजागृती व्हावी. आपली शेती-माती आणि संस्कृतीबाबत अभिमान निर्माण व्हावा. या करिता या रस्त्याच्या सुशोभिकरणात विविध शिल्प उभारण्यात येणार आहे. PCMC NEWS
बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये समाधान
राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी आमदार लांडगे यांनी राज्यव्यापी चळवळ उभी केली होती. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या माध्यमातून या लढ्याला बळ देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. त्यानंतर राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यानंतर आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत घेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. आता बैलागडा शर्यत (bullock cart race) शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गाडामालक, बैलगाडा प्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रिया :
महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत, कुस्ती, कबड्डी, योगमुद्रा अशा विविध शिल्पांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती आणि विधायक संदेश जाईल. या संकल्पनेतून भोसरी गावजत्रा मैदान परिसर, तसेच स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे काम करताना सुशोभिकरण करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.