पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यसाठी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात दि.२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३९ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे . आपल्या समाजात मोठया प्रमाणात अंघ व्यक्तींना कोर्नियाचे अंधत्व आहे. आणि त्यांच्यापैकी किमान एक तृतीयांश लोकांना नेत्र बुब्बुळे प्रत्योरोपनाचा फायदा होऊ शकतो. (PCMC)
दि.२६ ऑगस्ट सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले.
प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागनाथ यम्पल्ले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे व प्रमुख उपस्थिती कोर्निया तज्ज्ञ डॉ. आशिष घोष यांची होती. डॉ. नागनाथ यम्पल्ले, डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला. डॉ. आशिष घोष यांनी नेत्रदान व नेत्र पटल साठवण याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ अंजली कुलकर्णी यांनी नेत्रदाना बाबतीत समज व गैरसमज यावर माहिती दिली. (PCMC)
नेत्रदान पंधरवडा उद्धघाटन प्रसंगी डॉ. प्रज्ञा निकम, डॉ. प्रिया हरिदास, डॉ. हर्षदा पवार, जिल्हा नोडल ऑफिसर एस.जी.राठोड नेत्र चिकित्सा अधिकारी धनंजय भागवत व मयुरी, तसेच ऑपरेशन थिएटर प्रमुख जयश्री दीक्षित, वार्ड प्रमुख नयना भालेकर व इतर अधिपरिचारिका तथा समुपदेशक सीमा हगवणे, व तसेच संतोष चव्हाण कार्यक्रम सहाय्यक व प्रशिक्षणार्थी डॉक्टर, नर्सिंग व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रज्ञा निकम यांनी मानले. कार्यक्रमाची समाप्ती नेत्रदान प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, फेरी, शाळामध्ये जनजागृती कार्यक्रम व पथनाट्य राबविण्यात येणार आहेत.