Wednesday, December 4, 2024
HomeNewsPCMC:डी वाय पाटील आकुर्डी येथे सेंटर फॉर एक्सलन्स’ चे उद्घाटन

PCMC:डी वाय पाटील आकुर्डी येथे सेंटर फॉर एक्सलन्स’ चे उद्घाटन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:आकुर्डी येथील नामांकित डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी,डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे  सिमेंट उत्पादनातील अग्रगण्य कंपनी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीच्या पिंपरी चिंचवड विभागातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे उद्घाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीचे तांत्रिक सल्लागार   डॉ. मनमोहन कालगल,  क्षेत्रीय तांत्रिक विभाग प्रमुख अरविंद महाजन, प्रादेशिक  प्रमुख सेल्स अँड मार्केटिंग रविशंकर सिंग, क्षेत्रीय तांत्रिक विभाग प्रमुख, विशाल कुलकर्णी, योगेश कुलकर्णी तसेच , डी. वाय. पाटील इनेटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू प्रोफेसर. प्रभात रंजन, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, डी. वाय. पाटील इनेटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे उप कुलगुरू डॉ.संदीप चटर्जी,  डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ॲड रिसर्च च्या प्राचार्य   डॉ.अनुपमा पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ प्रविण गोरडे उपस्थित होते.  प्रा. तेजश्री गुळवे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ प्रविण गोरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अल्ट्रा टेक सिमेंटच्या डॉ मनमोहन कालगल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सेंटर ऑफ एक्सलन्स बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी असे नमूद केले की अल्ट्रा टेक सेटर ऑफ एक्सलन्स सहयोगी उपक्रम शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. करिअरच्या विविध संधी आणि सिमेंट काँक्रीटच्या विकासाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.अरविंद महाजन, रविशंकर सिंग यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रोफेसर प्रभात रंजन यांनी  भविष्यात या सेंटर अंतर्गत संशोधन केंद्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता डॉ. अतुल कोल्हे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियांत्रिकीच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या  प्राचार्या डॉ सौ. अनुपमा  पाटील , कुलकचिव श्री वाय के  पाटील,यांचे मार्गदर्शन लाभले.
या  सेंटर ऑफ एक्सलन्सच्या  उदघाटनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. तेजस एस. पाटील, संस्थेचे चेअरमन श्री. सतेज डी. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय