आमदार अश्विनी जगताप यांनी घेतल्या वाकड, विनोदे वस्ती परिसरातील सोसायटीधारकांच्या भेटी (PCMC)
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे केले आवाहन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. चिंचवड मतदार संघात विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करत विधानसभेवर पाठवण्यात असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले आहे. (PCMC)
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय (ए) व मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी आज वाकड विनोदे वस्ती परिसरातील सोसायटी धारकांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी त्यांच्यासोबत याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या प्रा. भारती विनोदे, विशाल कलाटे, संत तुकाराम सह.सा.का.संचालक बाळासाहेब विनोदे, प्रसाद कस्पटे, विजय विनोदे, अक्षय विनोदे, मुकेश विनोदे, निखिल इंगवले, शैलेश लोखंडे, सूरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, सनी भुजबळ, अक्षय कलाटे, विक्रम कलाटे यांच्यासह सोसायटी धारक सदस्य , नागरिक , बंधू-भगिनी यांच्यासह भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (PCMC)
वाकड विनोदी वस्ती परिसरातील रॉयल कॅस्टल, ॲटलांटा, साई लक्झरीया, ट्रिनिटी, इट्रेंड, ऍक्रोपॉलिस, कोहिनूर कोर्टयार्ड, पॅव्हेलीयन 79, यासह प्रमुख सोसायटींना भेटी देत तेथील मतदारांशी संवाद साधला. नागरिकांनीही यावेळी आमदार अश्विनी जगताप यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही शाश्वत विकासाच्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहोत असे सांगत होते.
सोसायटी धारक मतदार भाजपच्याच पाठीशी..
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, वाकड- विनोदे वस्ती हा परिसर आयटी हब हिंजवडीचे प्रवेशद्वार आहे. या परिसरात वाढते नागरिकरण यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण होत होती. परंतु आता मेट्रो या परिसरात धावणार आहे. त्याचे काम देखील वेगाने सुरू आहे. तसेच सिग्नल फ्री, सुसज्ज असे रस्ते करण्याचाही भाजपचा मानस आहे. भारतीय जनता पक्षाने शंकर जगताप यांना या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे नक्कीच या भागातील सोसायटी धारक मतदार शंकर जगताप यांच्या म्हणजेच भाजपच्या पाठीशी राहतील असा ठाम विश्वास आहे.
– अश्विनी जगताप, आमदार चिंचवड विधानसभा.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित