Wednesday, December 4, 2024
HomeNewsPCMC:दुर्गा नगर एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडीधारकांना घर द्या,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा -...

PCMC:दुर्गा नगर एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडीधारकांना घर द्या,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – विलास घाडगे

दुर्गा नगर एसआरए प्रकल्पात १०० सदनिकांचा घोटाळा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१९ – दुर्गा नगर एसआरए प्रकल्पाचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने सुरू केले आहे. दुर्गा नगर आणि शरद नगर येथील झोपडीधारकांसाठी ३६० सदनिका बांधून तयार आहेत. त्यापैकी काहीचे वाटप झाले आहे. परंतु दुर्गा नगर येथील झोपडी झोपडीधारकांना डावलून महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील कर्मचारी, अधिकारी, पोलीस व या भागातील पुढारी मंडळी मूळ झोपडीधारकांना डावलून बेकायदेशीररित्या दुर्गा नगर येथील त्यांच्या झोपड्या पाडत आहेत. याबाबत समन्वयक विलास घाडगे यांनी वेळोवेळी एसआरए अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत माननीय उच्च न्यायालयात ज्ञानेश्वर पांडुरंग गारगोटे यांनी दावा दाखल केला असता माननीय उच्च न्यायालयाने एसआरए अधिकाऱ्यांना याबाबत चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अधिकाऱ्यांनी याविषयीचा अद्यापही अहवाल सादर केला नाही. ३५ झोपड्या बाकी आहेत त्या पाडण्यासाठी विकसक यांनी स्थानिक गुंड यांना हाताला धरून रात्री सात नंतर झोपड्या पाडण्याचे बेकायदेशीर काम केले आहे. या झोपडीधारकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांना त्यांच्या न्याय हक्काची झोपडी मिळालीच पाहिजे अशी मागणी करीत रविवारी दुर्गा नगर येथे प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी विलास भागवत घाडगे, दीपक हणमंत हलूरकर, बाबासाहेब भगवान गोरे, अब्दुल जमादार, सीता विठ्ठल नांदवते, बाबासाहेब कदम, आतिश दिलीप कदम, प्रशांत दिलीप कदम, प्रमिला पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी विलास भागवत घाडगे यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले की, रात्री अपरात्री दुर्गा नगर येथील उर्वरित झोपडीधारकांच्या झोपड्या पाडून त्यांच्यावर अन्याय केला आहे. याविषयी दुर्गा नगर येथील उर्वरित झोपडीधारकांनी रविवारी दुर्गा नगर येथे महानगरपालिकेचा निषेध करीत आंदोलन केले. तसेच मूळ झोपडीधारकांना सदनिका द्याव्यात अशी मागणी केली अन्यथा मनपा आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या ठिकाणी या सणाच्या अधिकाऱ्यांनी व मनपा अधिकाऱ्यांनी बोगस सर्वे केला आहे बोगस नोंदी केले आहेत मृत व्यक्तींच्या नावे बोगस खरेदी दाखवून दुसऱ्याच्या नावे खोटे खरेदीखत केले आहे. दुर्गा नगर मध्ये मूळ झोपडी मालकांमध्ये एकही बोबडे आडनावाची व्यक्ती नसतानाही जवळपास आठ बोबडे नावाच्या व्यक्तींना सदनिका देण्यात आले आहेत. यामध्ये अशोक संदिपान बोबडे, विकास झुंबर पुळवले, सविता अरुण तूरुकमारे हे बोगस असल्याने त्यांची कागदपत्रे तपासली जावीत. तसेच तसेच मूळ झोपडीधारक विठ्ठल लक्ष्मण फुटक, पांडुरंग कोंडीबा शिंदे, गोकुळदास उत्तमराव घुले, चांगदेव काशिनाथ तांदळे व इतर हे मृत झाल्यानंतर त्यांच्या नावे बोगस कागदपत्र सादर करून खरेदीदार यांनी शासनाची फसवणूक केली आहे आणि मूळ झोपडीधारकांवर अन्याय केला आहे. यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मनपा आयुक्त कार्यालयासमोर पुढील आठ दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय