पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:शिवसेना नेते दिलीप पांढरकर यांच्या पुढाकाराने
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना जनसंपर्क कार्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी मोफत चष्मे वाटप,भव्य रक्तदान शिबिर, मेडिकल चेकअप,नेत्र चिकित्सा चेकअप असे विविध कार्यक्रम शिवसेना ज्येष्ठ नेते दिलीप पांढरकर यांनी आयोजित केले होते.
या कार्यक्रमात 168 नागरिकांनी रक्तदान केले तसेच या कार्यक्रमास नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप याचा लाभ 523 नागरिकांनी घेतला.
यावेळी कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष किसनराव भालेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महाराष्ट्रातील अनमोल असं कार्य तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची कामे पोहोचवली त्याचप्रमाणे अहोरात्र मेहनत घेत असलेले मुख्यमंत्री हे आपल्याला लाभलेत असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,पिंपरी विधानसभा संघटिका शैला निकम,प्राजक्ता पांढरकर,सोनाली वाल्हेकर,दुर्गा पांढरकर,वैशाली पांढरकर,रंजना बहिरट,अश्विनी बागुल,शारदा साने,सारिका जाधव,राजेंद्र काळभोर,अशोकराव पांढरकर,सुरेश लिंगायत,रामभाऊ सुपेकर,अशोकराव काळभोर, चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष दत्तात्रय रसाळ, बबनराव जाधव,गणेश साने,शैलेश वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हर्षवर्धन पांढरकर,अमित पांढरकर यांनी मानले