Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : महानगरपालिकेचे विकास प्रकल्प, विविध योजना स्थानिक स्वराज संस्थांना प्रेरणा देणाऱ्या...

PCMC : महानगरपालिकेचे विकास प्रकल्प, विविध योजना स्थानिक स्वराज संस्थांना प्रेरणा देणाऱ्या आहेत – काकिनाडा मनपा आयुक्त श्रीमती भावना (आयएएस)

PCMC

काकिनाडा मनपा आयुक्त श्रीमती भावना (आयएएस) यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाची महापालिकेला भेट (PCMC)


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प, उपक्रम, उद्याने, क्रीडांगणे आदी ठिकाणी काकिनाडा महापालिकेच्या आयुक्त श्रीमती. भावना (आयएएस) यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली. (PCMC)

महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आंध्रप्रदेशातील काकिनाडा महापालिकेच्या शिष्टमंडळाने अभ्यास दौऱ्यानिमित्त महापालिकेला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे किरणराज यादव, सहशहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, नितीन देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (PCMC)

यावेळी काकिनाडा महापालिकेच्या शिष्टमंडळाने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, अशा विविध प्रकल्पाची पाहणी केली. तसेच महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्यप्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात महापलिकेच्या विविध विभागामार्फत शहरात उभारण्यात आलेले प्रकल्प, योजना,उपक्रम याची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती घेतली.

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रेरणा देणारे मनपाचे उपक्रम

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी उभारलेले विकास प्रकल्प, सुरु केलेल्या योजना, राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेचे प्रयत्न इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रेरणा देणारे आहेत.

श्रीमती भावना (आय.ए.एस.) आयुक्त, काकिनाडा मनपा

Exit mobile version