९१ हजार ८ मुलांना जंतनाशक गोळ्यांचे डोस (Alandi)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील खेड तालुक्यात बुधवारी ( दि. ४ ) ला शासन मार्गदर्शक सूचना प्रमाणे राष्ट्रीय जंतनाशक दिवस विविध आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे माध्यमातून संपूर्ण खेड तालुक्यात साजरा करण्यात आला. शेलपिंपळ गाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातील या मोहिमेचे उदघाटन शालेय विद्यार्थिनींना जंतनाशक गोळीची मात्रा देऊन शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमदार बाबाजी काळे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेत ९१ हजार ८ मुलांना जंतनाशक गोळ्यांचे डोस देण्यात आले. (Alandi)
या प्रसंगी काळूसचे माजी उपसरपंच केशव आरगडे, युवा सेना अध्यक्ष पप्पू राक्षे, वकीचे सरपंच भाऊ जरे, तुकाईवाडीचे उपसरपंच सोपान कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ मानकरी, डॉ. हर्षाली मुराडे ,डॉ. इंदिरा पारखे, आरोग्य सेविका शोभा दौंडकर, आशा दौंडकर, वृषाली वैष्णव, राजश्री कंगवे, पार्वती कोरडे, वैष्णवी घोलप, गजानन दुतोंडे, सुहास टकले यांचेसह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांचे हस्ते शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थिनींना जंतनाशक गोळीची मात्रा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथील सर्व कामकाज, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची आमदार बाबाजी काळे यांनी आस्थेने विचारपूस करीत सुसंवाद साधला. आरोग्य केंद्रास आवश्यक असणाऱ्या बाबींची त्यांनी माहिती घेत अडचणी सोडवण्याची ग्वाही आमदार काळे यांनी दिली.
खेड तालुकत्यात ९१ टक्के काम :- डॉ. पारखे
खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास माने यांचे मार्गदर्शनात राष्ट्रीय जंतनाशक दिवस अंतर्गत खेड तालुक्यातील मुला – मुलींना जंतनाशक गोळ्यांचे डोस देत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ९१ हजार ८ मुलांना जंतनाशक गोळ्यांचे डोस देण्यात आले. या मोहिमेचे खेड तालुक्यात ९१ टक्के काम झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.