Friday, January 3, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : 'अभिराज फाऊंडेशन' मध्ये दिव्यांग साठीच्या अडथळा विरहित निवडणूक प्रसार व...

PCMC : ‘अभिराज फाऊंडेशन’ मध्ये दिव्यांग साठीच्या अडथळा विरहित निवडणूक प्रसार व प्रचार मार्गदर्शन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – दिव्यांगांसाठी अडथळा विरहित निवडणूक प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने शुक्रवार दिनांक 25/10/2024 रोजी 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड येथील अभिराज फाउंडेशन या संस्थेत विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आणि जवळील दिव्यांग मतदारांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (PCMC)

औचित्य होते संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

कार्यक्रमात या आशयाची “आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, मतदानासाठीची शपथ देण्यात” आली.निवडणुकीत दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध सुविधाची माहिती सहाय्यक नोडल अधिकारी श्री गणेश टिळेकर यांनी दिली.


यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवर अस्थिवंग दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, ही व्हील चेअर ढकलण्यासाठी सहाय्यक, तसेच मतदान केंद्रात व्हीलचेअर अगदी व्यवस्थित फिरेल अशी फर्निचर रचना करण्यात आलेली आहे, अंशतः अंध व्यक्तींसाठी भिंग पुरविण्यात येणार आहे, सर्व मतदान केंद्र तळमजल्याला घेण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रांवर आल्यानंतर त्यांना रांगेत उभे राहून मतदान केंद्रात वाट पाहण्याची गरज नाहीत.

तर त्यांच्यासाठी थेट व्हीआयपी स्वरूपाचे मतदान, ज्या दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांवर जाणेही अवघड होत आहे अशांसाठी घरून ने आण करण्यासाठी रिक्षाची व्यवस्था, अंध दिव्यांगांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका प्रत्येक मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. (PCMC)

मतपत्रिकेवरील उमेदवारांची नावे वाचून त्यांचा क्रमांक लक्षात ठेवून बॅलेट मशीन वरील याच अनुक्रमांकचे बटन दाबून दिव्यांग मतदार करू शकणार आहेत, जे दिव्यांग अगदी झोपून आहेत, त्यांना घरूनच मतदान करता येईल या सुविधांची माहिती देण्यात आली.

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू प्रदर्शन पाहून श्री राजीव घुले यांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेला केक श्रीनिवास दांगट यांचे हस्ते कापून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमात स्वीप नोडल अधिकारी श्री राजीव घुले, दिव्यांग नोडल अधिकारी श्रीनिवास दांगट, मनोज माचरे पीसीएमसी कर्मचारी महासंघ, स्वीप कमिटीचे रोहित साळवी, दीपक यण्णावार, सचिन लोखंडे, श्रीमती पल्लवी गायकी उपस्थित होते. (PCMC)

गणेश लिंगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चव्हाण अनिता यांनी आभार मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय