Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : अर्थसंकल्पात कामगारांच्या अपेक्षांची पुन्हा उपेक्षा – कामगार नेते काशिनाथ नखाते

PCMC : अर्थसंकल्पात कामगारांच्या अपेक्षांची पुन्हा उपेक्षा – कामगार नेते काशिनाथ नखाते

PCMC

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प (Union Budget) जाहीर झाला, पण नेहमीप्रमाणे मजूर, कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना यात काहीच मिळाले नाही. कामगारांच्या हातात रोजगार देण्यासाठी आवश्यक असा सरकारकडे कार्यक्रम नाही. अशी टीका कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे. (PCMC)

काशिनाथ नखाते यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हणाले की, कष्टकऱ्यांसाठी घरकुल योजना मध्ये विशेष आरक्षण असणे गरजेचे होते, मात्र २०२२ गेला तरी आणि २०२५ आला मात्र सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांना घरे मिळालेच नाहीत. इतरांना ७ वे ८ वे वेतन आयोग लागू होतात भरगच्च पगार मिळतो. मात्र कष्टकऱ्यांना पगार वाढीचा पत्ता नाही.

पुढे ते म्हणाले कि, सरकारी नोकऱ्यांबाबत कोणताही ठोस उपाय नाही, असंघटित कामगारांसाठी कोणतीही ठोस कामाची आणि वेतनाची हमी नाही, मजुरांसाठी, कामगारांसाठी संरक्षण आणि कल्याणकारी योजना हव्यात, पण त्या कुठय? महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी कोणताही दिलासा सरकारने दिलेला नाही. कामगारांच्या अपेक्षांची पुन्हा एकदा उपेक्षा झाल्याची टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे. (PCMC)

हे ही वाचा :

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

मोठी बातमी : 40 लाख द्या, MPSC ची प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, राज्यात खळबळ

घर घेणाऱ्या इच्छुकांसाठी धक्का! १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात १० टक्के वाढ

संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत

Exit mobile version