Saturday, May 4, 2024
HomeNewsजुन्नर : आई-वडील दैवत आहे, त्यांची स्वप्नं पूर्ण करा - संतोष काशिद

जुन्नर : आई-वडील दैवत आहे, त्यांची स्वप्नं पूर्ण करा – संतोष काशिद

जुन्नर / आनंद कांबळे : बाळांनो, आई -बाबांनी हे सुंदर जग आपल्याला दाखविल आहे, जीवन खूप सुंदर व अनमोल आहे. असेच यशवंत, गुणवंत व्हा,चांगल्या मित्रांची संगत करा. आई, वडील व गुरूंचा आदर करा, त्यांची स्वप्नं पूर्ण करा, असे ऑस्ट्रेलिया निवासी संतोष काशिद यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

चिंचोली (काशिद) ता.जुन्नर येथील श्री समर्थ मधुकरराव विद्यालयात एस. एस. सी.चा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल गुरूदक्षिणा फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकाचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून काशिद बोलत होते.

संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव काशिद हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक – शिक्षकेतर वृंद यांना सन्मान चिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच अनया या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व बिस्किटे वाटण्यात आली.

या प्रसंगी श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर चे माजी मुख्याध्यापक एफ.बी.आतार, संतोष काशिद, सामाजिक कार्यकर्ते संदिप पानसरे, संचालक अजित काशिद, तुकाराम चव्हाण, भास्कर काशिद, मनिषा काशिद आदि मान्यवरांसह पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल गडगे यांनी तर उपशिक्षक विठ्ठल भोर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय