Thursday, July 18, 2024
Homeकृषीकांदा 50 पैसे प्रति किलो ; शेतकऱ्याचे अश्रू अनावर !

कांदा 50 पैसे प्रति किलो ; शेतकऱ्याचे अश्रू अनावर !

 

पुणे : भारत सरकारने जवळपास दोन दशकांपूर्वी 50 पैशांची नाणी काढणे बंद केले होते. तेव्हापासून देशभरातील बाजारात 50 पैशाचे मूल्य संपले आहे. त्यामूळे 50 पैशांना बाजारात उपलब्ध असलेली उत्पादनेही गेल्या अनेक वर्षांपासून किमान 1 रुपयाला उपलब्ध होत आहेत.हे खरे असले तरी देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते.

असे असले तरी महाराष्ट्रातील मंडईत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी ही 50 पैसे ते 75 पैसे प्रतिकिलो अशी केली जात आहे. जे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. कांद्याचा हा भाव आतापर्यंतचा सर्वात नीचांक आहे.

सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. राज्यातील इतर मंडईतही भाव 1 रुपये किलोपर्यंत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता फुकटात कांदा वाटप करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामूळे दिवस रात्र एक करुन पिकवलेला कांदा कवडी भावाने विकताना शेतकऱ्यांचे काय होत असेल याबाद्दल शासनकर्त्यांनी विचार करणे क्रमप्राप्त आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

बुद्ध पौर्णिमेनिमित्त युवा धम्म अभ्यासक प्रथमेश देसाई यांचे तरुणांना मार्गदर्शन !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय