घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील आमडे या गावी विश्वेश्वर क्रिकेट क्लब आयोजित भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
यामध्ये पांचाळे वॉरिअर्स पांचाळे या संघाने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक आर के 11 आंबेहातविज (जुन्नर ), तृतीय क्रमांक आदर्श क्रिकेट क्लब, म्हाळुंगे सुपेधर, तर चतुर्थ क्रमांक सालोबा क्रिकेट क्लब इंगळून (जुन्नर) या संघांनी पटकाविला.
ब्रेकींग : स्वयंपाकाच्या गॅस (LPG) दरात प्रचंड वाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर गॅस दरवाढीचा भडका
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बक्षीस वितरण ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉ हरीश खामकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संजयकुमार झांजरे, पोलीस पाटील गणेश असवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कामाजी भोईर, ट्रायबल फोरमचे महासचिव विशाल दगडे, अण्णासाहेब कराळे, महादेव ग्रुपचे प्रदीप असवले, सोमा खरमाडे, माळीण तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल असवले, मारुती असवले व ग्रामस्थ उपस्थित होते.
ट्रॉफी साठी सौजन्य भरत असवले यांनी केले तर नारायण बांबळे, बबन अंकुश, निवृत्ती शेळके, दिलीप करवंदे यांनी संयोजन केले. पंच म्हणून बंडू असवले, विशाल असवले यांनी नियोजन केले तर समालोचक म्हणून अशोक घोडे, काळू बांबळे, राहुल असवले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन असवले यांनी केले, तर विकास असवले यांनी आभार व्यक्त केले.
पुणे : गोदामाला भीषण आग, बाजूची दुकाने जळून खाक
हसन मुश्रीफ यांना आयकर विभाग ताब्यात घेणार ? किरीट सोमय्यांचं ट्विट