Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याNoida : बॅंक महिला कर्मचारीने संपवलं जीवन, सहकर्मचाऱ्यावर छळाचा आरोप

Noida : बॅंक महिला कर्मचारीने संपवलं जीवन, सहकर्मचाऱ्यावर छळाचा आरोप

नोएडा : अॅक्सिस बॅंकेच्या एका महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 27 वर्षीय शिवानी गुप्ता, जी रिलेशनशीप ऑफिसर म्हणून कार्यरत होती, तिला टर्मिनेशन लेटर मिळाल्यानंतर काही तासांतच विष पिऊन आत्महत्या केली. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने सहकर्मचार्यांवर छळल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Noida)

शिवानी गुप्ताने 12 जुलैला संध्याकाळी 4 वाजता टर्मिनेशन लेटर मिळाल्यानंतर केवळ दोन तासांतच आपले जीवन संपवले. Times of India च्या रिपोर्टनुसार, तिने आत्महत्येपूर्वी 5 पानांची सुसाईड नोट लिहली होती, ज्यात तिने आपल्या सहकर्मचार्यांवर छळवणुकीचे आरोप केले आहेत. सुसाईड नोटमध्ये शिवानीने सहा जणांचे उल्लेख केले आहेत, ज्यात दोन सेल्स मॅनेजर्स देखील आहेत. (Noida)

शिवानीने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, मागील सहा महिन्यांपासून तिला सहकर्मचार्यांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. विशेषतः, एका महिला सहकाऱ्याने तिला सतत “बंदरिया” आणि “वेडी” म्हणून हिणवलं आणि क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालत होती. या मानसिक त्रासामुळे तिचे हात थरथर कापत असताना सहकाऱ्यांनी तिची चेष्टा केली होती.

शिवानीने अनेक वेळा आपली तक्रार सेल्स मॅनेजर आणि एरिया सेल्स मॅनेजरकडे केली होती. पण त्याऐवजी तिला मदत करण्याऐवजी, व्यवस्थापनाने तिला राजीनामा देण्यास सांगितले. अशा प्रकारे, व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि सहकर्मचार्यांच्या वागणुकीमुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

अॅक्सिस बॅंकेच्या प्रवक्त्यांकडून या प्रकरणी शोक व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही आपल्या शाखेत प्रायव्हेट एजंसीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अॅक्सिस बॅंकेमध्ये आम्ही कामाच्या ठिकाणी छळवादाचा निषेध करतो आणि अशा प्रकाराला आमचे समर्थन नसेल.”

सध्या पोलिस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत. शिवानीची सुसाईड नोट आणि तिच्या सहकर्मचार्यांवर केलेले आरोप तपासण्यात येत आहेत. याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Noida

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का ; अनेक नेत्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश

बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव ! मुंबईत 600 लोडर्स पदासाठी तब्बल 25,000 तरूणांची गर्दी

मोठी बातमी : लाडकी बहीण’ योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’ मिळणार लाभ

केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

कृषी महाविद्यालय, सोनापूर अंतर्गत भरती

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय