Monday, October 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदारू नको भाऊ... या दूध घेऊ ...!

दारू नको भाऊ… या दूध घेऊ …!


“दारू नको भाऊ ! या दूध घेऊ !!” अभियान राबविताना मान्यवर..

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून विविध ठिकाणी मौजमजा करणेे आणि दारूचे सेवन करण्याचे प्रकार खूप प्रमाणात वाढत असून अनेक वाद होतात, त्याचबरोबर अपघात होऊन अनेकांचे मृत्यू होत आहेत. हे टाळता यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दारू नको भाऊ…या दूध घेऊ..!  उपक्रम आयोजित करून दुधाचे वाटप करण्यात आले. याला नागरिक आणि कामगारांनी उदंड प्रतिसाद दिला. अनेक कामगारांनी दारू सोडण्याचा निर्धार यावेळी केला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

“आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहत असून बाजूला एक कामगार दररोज दारू पिऊन भांडत असल्यामुळे आम्हाला त्रास होतो आणि त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना आणि घरामध्ये कायम वाद आणि वितुष्ट सुरू असते. दारू सोडवण्यासाठी असे उपाय केल्यास दारू सुटू शकते.”

– वंदना साळवे

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, निमंत्रक सलीम डांगे, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, उपाध्यक्ष राजेश माने, संघटक अनिल बारवकर, प्रदेश सचिव तुषार घाटोळे, इरफान चौधरी, ओमप्रकाश मोरया, सखाराम केदार, तुकाराम माने, सुरेश देशमाने, यासिन शेख, विनोद गवई, निरंजन लोखंडे, पंडित कांबळे यानीं उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

दारू नको भाऊ ! या दूध घेऊ..! अभियानास नागरिकांचा प्रतिसाद !

सततच्या दारू पिण्यामुळे कौटुंबिक कलहात वाढ

३१ डिसेंबर संधेला व १ जानेवारी च्या सकाळी असा  दोन वेळा हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. देशभरामध्ये रस्ता अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असून यामध्ये दारू पिऊन अपघात झाल्याचे प्रमाण वाढले  आहे. दारुमुळे कामगार वर्ग आणि इतर नागरिकांमध्ये भांडणाचे प्रकार आणि कुटुंबात कलह निर्माण होत आहे.

त्यामुळे दारू सोडून नवीन वर्षाचे स्वागत देशभक्तीपर गाणे लावून एक वेगळा उपक्रम करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्तिद्वारे नववर्षाचे स्वागत करूया, असा संकल्प अनेकानीं केला.


संबंधित लेख

लोकप्रिय