हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले.