Wednesday, December 4, 2024
Homeराजकारणया पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त 'ऑनलाईन रोजगार महोत्सव' व 'अभिप्राय' अभियान.

या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘ऑनलाईन रोजगार महोत्सव’ व ‘अभिप्राय’ अभियान.

             

महाराष्ट्र जनभूमी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जून २०२० रोजी २१ वर्ष पूर्ण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे, जो धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय आणि पुरोगामी विचारांचे प्रबळ समर्थक आहे, असे युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी म्हटले आहे.

          पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीने ‘ऑनलाईन नोकरी महोत्सव’ अंतर्गत महाराष्ट्र  राज्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या परिस्थितीत राज्यातील युवकांनी आळस झटकून या रोजगारसंधी स्विकारण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजेत . कष्ट करण्याची  इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी नक्कीच मिळेल. तेव्हा या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी प्राप्त करून घेण्यासाठी राज्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी पुढे यावे असे आवाहन ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ कडून करण्यात आले आहे.

            यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियान हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांसाठी राबविण्यात येणार आहे आणि या अभियानात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय