नाशिक : राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची आज नाशिकच्या (Nashik) चांदवडमध्ये सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच मोठा गोंधळ उडाला आहे. Nashik JP Gavit news
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी आमदार जे.पी.गावित (JP Gavit) यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या या सभेला शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले असे सर्वच इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (cpim) देखील इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे.
राहुल गांधी यांच्या सभेसाठी ज्या नेत्यांची यादी बनवण्यात आली होती. त्यामध्ये माकपचे नेते माजी आमदार जे.पी.गावित यांचं देखील नावं होतं. या सभेला उपस्थित राहण्यासाठी गावित सभास्थळी पोहोचले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी आडवलं. त्यानंतर तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून जे.पी.गावीत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. त्यावेळी जे.पी.गावीत यांना आपली ओळख पटवून द्यावी लागली.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…
ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय
जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा
जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही