Nagpur : नगरधन येथील पीएचसी अंतर्गत आशा व गटप्रवर्तकांची बैठक आशा व गटप्रवर्तक संघटना (सीटू) चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे व महासचिव प्रीती मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा गटप्रवर्तक व आशांची पुन्हा संघर्षाची तयारी दर्शवली आहे. Nagpur news
यावेळी गटप्रवर्तक यांना मानधनात मोठी वाढ न दिल्याची निराशा दर्शवून महाराष्ट्र शासनाचा निषेध या बैठकीत करण्यात आला. संपाला तूर्तास स्थगिती दिली गेल्या कारणाने पुढे आचार संहिता संपल्यानंतर शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास कृती समितीने संपाची स्थगिती उठवल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करून जीआर काढण्याकरिता गटप्रवर्तक यांचे करता पुन्हा संपात उतरण्याची तयारी दर्शवली.

यावेळी आशांना ७ हजार रुपये व गटप्रवर्तक यांना १० हजार रुपये वाढ देण्यात यावी, २ हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, गटप्रवर्तक यांना आरोग्य वर्धिनीचे १ हजार ५०० रूपये महिना द्यावे, गटप्रवर्तक यांना आशा सुपरवायजर नामोल्लेख करून कंत्राटी कर्मचाऱ्यामधे समायोजन करावे, या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी परत संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. Nagpur


हे ही वाचा :
ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक
ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर
जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल