Saturday, December 14, 2024
Homeविशेष लेखMutton Kulambu : लोकप्रिय चेट्टीनाड दक्षिण भारतीय मटण डिश (video)

Mutton Kulambu : लोकप्रिय चेट्टीनाड दक्षिण भारतीय मटण डिश (video)

चेट्टीनाड फूड तामिळनाडूमधील चेट्टीनाड भागात मांसाहारी पदार्थांसाठी लोकप्रिय आहे. चेट्टीनाड पाककृतीमधील काही लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणजे चिकन करी, मटन करी, फिश करी, आदिरसम आणि बरेच पदार्थ. चेट्टीनाड पाककृती त्याच्या गरमपणासाठी (मसालेदार), विविध प्रकारचे मसाले आणि मांसाहारी पदार्थांसाठी ताजे ग्राउंड मसाले यासाठी लोकप्रिय आहे. (Mutton Kulambu)

तामिळनाडू आणि चेट्टीनाड क्षेत्रांमध्ये मटण, खोबरं आणि मिरे मसाल्यांच्या परफेक्ट मिश्रणाने ग्रेव्ही तयार करून ही स्वादिष्ट डिश तयार केली जाते, यास स्थानिक भाषेत मटन कुझंबू ( Mutton Kuzhambu) असेही म्हणतात, ही डिश आणि रेसिपी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

मटन कुझंबू साधारणपणे सर्व प्रकारचे मसाले यामध्ये वापरतात, कांदे, टोमॅटो, आले, लसूण किसलेलेओले खोबरे वापरून खास मेहनत करून ग्रेव्ही बनवली जाते. मटणाचे हाडासह मोठे तुकडे मॅरीनेट करून ठेवले जातात.
या डीशच्या रेसिपी मध्ये करी किंवा रस्सा, सुके मध्यम मटण बनवून भात, इडली, डोसा आणि ॲपम सोबत हे मटण खातात.

साधारणतः, मटन कुझंबू करण्यासाठी मटन तुकडे (हाडांसह) वापरणे उत्तम असतं, कारण हाडामुळे करीला अधिक चव मिळते. मसाल्यांमध्ये तिखट मिरच्यापासून कोथिंबीर, हळद, गरम मसाला, आणि नारळ पेस्ट यांचा समावेश केला जातो. कधी कधी, मसाला जाड करण्यासाठी चणे, काजू किंवा बदाम घालता येतात. (Mutton Kulambu)

ह्या डिशला परफेक्ट स्वादिष्ट बनवण्यासाठी तिखट मिरच्या वापरतात, इथे बाजारातील पॅकिंग केलेले मसाले वापरत नाहीत, मटण खास चुलीवर बनवून त्यातील घट्ट झालेली ग्रेव्ही आणि मटणाचे तुकडे खायला चवदार असतात.

संबंधित लेख

लोकप्रिय