Thursday, December 5, 2024
Homeराज्यMumbai : हिंजवडी आयटी पार्क स्थलांतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

Mumbai : हिंजवडी आयटी पार्क स्थलांतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मुंबई येथील पक्ष कार्यालय येथे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन घेण्यात आले.

“महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो” रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा”या प्रकारच्या जोरदार घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आल्या.

यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले “युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या पोकळ बाता करणाऱ्या सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे नवीन नोकऱ्या तर सोडा पण,आज आहेत त्या नोकऱ्या गमावण्याची वेळ महाराष्ट्रमधील युवकांवर आली असून सरकारने युवकांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचं ते म्हणाले. Mumbai news

वेदांता फॉक्स्कोन सारखा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दीड लाखाहून अधिक स्थानिक युवकांना रोजगारास मुकावे लागले होते ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा सरकारच्या चुकीमुळे हिंजवडी आयटी पार्क येथील ३७ कंपन्या परराज्यात गेल्याच्या घटनेंने पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना पुन्हा नोकऱ्या गमावण्याची नामुष्की ओढवली आहे, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पिंपरी चिंचवड युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “आदरणीय शरद पवारांनी राजीव गांधी आयटी पार्क वसवून संपूर्ण देशातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले.

यामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसर तसेच लगतचे पिंपरी चिंचवड शहराला मेट्रोसिटीचे रूप प्राप्त झाले. तसेच लाखो तरुणांना रोजगार मिळाला. सरकारचा चुकीच्या धोरणामुळे आहेत ते रोजगार भाजप काळात गमवण्याची पाळी स्थानिक तरुणांवर आली आहे. याचा आम्ही निषेध करतो. Migration of IT industry

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पिंपरी चिंचवड शहराचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर, तसेच मुंबई प्रदेश पदाधिकारी निलेश भोसले, प्रवक्ते प्रमोद बागल, विक्रम खामकर, उमेश अग्रवाल, शहभाज पटेल, अमित हिंदळकर, सुमित पाटील गुरुदत्त सिंग,राज जोशी, रॉबिन, योगेश, इरफान दिवटे, सचिन नारकर, ट्विंकल परमार, श्रेयस लोखंडे शहबाज खान उबेद साबरी, रजनीकांत गायकवाड अनिकेत बिरंगल आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते. Mumbai news

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक

संबंधित लेख

लोकप्रिय