(Rohit pawar) आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश – उन्हाळी पिकांना होणार फायदा
कर्जत, ता. १२ : तालुक्यातील घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन क्रमांक २ सुरु करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
‘‘घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती आणि सध्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याबाबत नियोजन करुन निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आल्याने घोड प्रकल्पातून दुसरं उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं. याबाबत प्रशासनाचे आभार.’’– रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असून यामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे कुकडीसह घोड प्रकल्पाच्या पाणी नियोजनाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. याबाबतचे पत्रही त्यांनी जलसंपदा विभाग यांना दिले होते. त्यानुसार आज घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन क्रमांक दोन सोडण्यात आले आहे. (Rohit pawar)
यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी, चारा पिके, ऊस आणि उन्हाळी पिकांसाठी या पिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत