– राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
पिंपरी : राज्यातील आरोग्य विभागाने कोविड तपासणीचे प्रमाण वाढवले आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांचे प्रमाण जास्त दिसत आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या नगण्य असून, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांचे कारण देवून हिंदू सण उत्सवांवर निर्बंध आणू नयेत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोविडच्या महामारीनंतर देशातील जनजीवनदोन वर्षांनंतर आता पूर्वपदावर आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरची आषाढ वारीनिमित्त दि. २१ जून २०२२ रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. तसेच, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखीसोहळाही नियोजित आहे. कोरोनामुळे दोन वर्षे पालखी निघाली नाही. त्यामुळे यावर्षी तमाम वारकरी आणि भाविकांचे लक्ष पालखी सोहळ्याकडे लागले आहे.
मात्र, राज्यात आता कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाखली सोहळ्यावर आता पुन्हा कोविडचे सावट निर्माण होवू लागलेत, अशी चिंता वाटू लागली आहे. वास्तविक, राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड तपासणीचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे.
कोविड रुग्ण संख्या वाढत असली तरी, अतिगंभीर रुग्णांची संख्या नगण्य आहे. यापूर्वीही तपासणी वाढवल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे लक्षात येते. रुग्ण संख्या वाढल्यास किंवा अतिगंभीर रुग्णांची संख्या वाढू लागल्यास निर्बंध येणे क्रमप्राप्त आहे. मात्र, गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढली, तर आषाढ वारी किंवा सण-उत्सवांवर बंदी घालणे, योग्य होणार नाही, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
काळजी घेवू अन् आषाढ वारीसह सण-उत्सव साजरे करु…
मास्कसक्ती आणि नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास आषाढ वारी आणि यापुढील सण-उत्सव जसे की गोकूळआष्टमी, श्रावण मास, नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव साजरा करण्यात अडथळा येणार नाही. कोविडमुळे नागरिकांना सतर्क करायलाच पाहिजे. पण, अवास्तव भिती निर्माण होईल आणि हिंदूंच्या सण-उत्सावावर निर्बंध येतील, असे धोरण नको, अशी राज्यातील वारकरी सांप्रदाय आणि भाविक वर्गातून प्रामाणिक मागणी आहे.
सध्य स्थितीला राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के इतके आहे. तसेच, राज्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण झाले आहे. ‘बुस्टर डोस’लाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जनजागृती करावी. त्यामुळे मास्क व अन्य काळजी घेवून आषाढ वारीसह सर्व हिंदू सण-उत्सव निश्चितपणे साजरे करता येईल, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख