आशियातील सर्वात मोठे आयटी हब असलेल्या पिंपरी चिंचवड हिंजवडी येथील आयटी पार्कमधील अनेक कंपन्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतरित होत आहेत. (migration of IT industry)
या ठिकाणी तब्बल 150 कंपन्या असून 5 लाख कर्मचारी येथे काम करतात. हिंजवडीत परिसरात 1 लाख पेक्षा अधिक कार आणि इतर वाहने कामासाठी ये जा करतात. मागील दहा वर्षापासून येथील वाहने तासनतास वाहतूक कोंडीत अडकतात. एखादा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासभर लागत असल्याने कर्मचारी ऑफिस नको रे बाबा त्या पेक्षा वर्क फ्रॉम होम बरे अशी मागणी करत आहेत.flustration in employees
150 पैकी तब्बल 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्या आहेत. येथील सार्वजनिक वाहतूक (PMPML) सक्षम नसल्यामुळे भारतातील सर्वात जास्त चारचाकी, दुचाकी पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आहेत.
एकूण आयटी कर्मचाऱ्यांमध्ये महिला मुलींचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना स्वतःच्या गाड्या घेऊन कामावर यावे लागते, पुणे शहर, पिंपरी चिंचवड मधील त्यांच्या निवासी ठिकाणापासून किमान 10 ते 20 किमी त्यांना रोज ये जा करावी लागते. वाकड, भूमकर चौक, डांगे चौक येथील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन चालकामुळे तसेच वाहतूक शाखेच्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील कर्तव्य शून्यता यामुळे येथे वाहतुकीला शिस्त लावण्यात अपयश आलेले आहे.
बंगलोर, हैद्राबाद, चैन्नई याठिकाणी देशातील प्रमुख आय टी पार्क तुलनेने हिंजवडी इतके मोठे नसले तरी तेथील वाहतूक व्यवस्था, (metro, public transport, trafic dicipline etc) याचे व्यवस्थापन उद्योग आणि कामगार स्नेही आहे. (migration of IT industry)
१९८५ ते १९९० च्या काळात पंतप्रधान राजीव गांधी यांनी दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्रात पुणे पिंपरी चिंचवड येथे आयटी पार्क साठी स्वतंत्र धोरण राबवले. राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान (IT) आणि इतर वाहन निर्मिती, मध्यम लघ उद्योगाच्या वाढीसाठी उद्योगस्नेही धोरण राबवण्यात किमान तीन दशके केंद्र आणि राज्यसरकारचे संपूर्ण उद्योग व कामगार धोरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. (migration of IT industry)
या काळात काँग्रेस व भाजपची सरकारे आलटून पालटून सत्तेवर होती, लोकसभा आणि विधान सभा प्रतिनिधी यांनी या मोठ्या कालखंडात माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. लोकशाही मध्ये सभागृहात एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे, मोठ मोठे प्रकल्प आणून (JNNURM) आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली अर्धवट प्रकल्प राबवण्यात आले. Failuar of projects
आज पिंपरी चिंचवड पुणे मध्ये मेट्रो प्रकल्पावर १३ हजार कोटी रुपये खर्च होऊनही २००८ पासून सुरुवात केलेला हा सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत आहे. या प्रकल्पाचा फायदा ना हिंजवडी आयटी च्या तिन्ही फेजला होणार आहे, ना नव्याने उभारणी केलेल्या चाकण, तळेगाव औद्योगिक कंपन्यांना होणार आहे, चाकण,तळेगाव एम आय डी सी तील कंपन्या आणि कामगार त्रस्त आहेत. pcmc news
आयटी कंपनीतील एकूण अंदाजे चार लाख कामगार, आणि चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड मधील एकूण 9 लाख ठीक ठिकाणी कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा( PMPL) राज्यकर्त्यांना सक्षम करता आली नाही. त्यामुळे मालकीच्या दुचाकी, चारचाकी घेऊन कामावर जाण्यासाठी त्यांची गर्दी वाढली.
पिंपरी चिंचवड शहरातील दिशाहीन आणि अपूर्ण असलेले अनेक प्रकल्प, वाहतूक कोंडी ई अनेक समस्यामुळे येथील उद्योग धंद्याचे स्थलांतर रोखले जाणार नाही. pcmc
मागील तीन दशकात गरवारे, टाटा मोटर्स, बजाज, फोर्स मोटर्स, इंडियन कार्ड क्लोदींग, फर्माईका, जनरल मोटर्स, टाटा नॅनो प्लांट आदी अनेक कंपन्यांनी शहर सोडले आहे, रबर,प्लास्टिक, फौंड्री व इतर पुरवठादार कंपन्या ( suppliers, ancillary, vendors) कंपन्या गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड येथे स्थलांतरित झाल्या आहेत.
इथे कंपन्यांची आणि नागरिकांची मागणी असूनही मागील तीन दशकात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकला नाही, याला कोणाचे संकुचित राजकारण कारणीभूत आहे.
केरळ, गोवा, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे उद्योग आणि नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय, मालवाहू (Cargo aircraft) प्रवासी विमान वाहतूक यासाठी मागील तीन दशकात मोठे विमानतळ निर्माण करण्यात आले.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस, विप्रो, टीसीयस, महिंद्रा, टीसीएस अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने राज्यभरातील तसेच देशभरातील लोक काम करतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर वाहतूक कोंडीची समस्या अजून गंभीर होते. त्यामुळे 37 कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत होत आहेत.
आणि हीच समस्या चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी औद्योगिक क्षेत्रात निर्माण होत आहे, येथील विजेचे लपंडाव, वाहतूक कोंडी, विद्युत दरवाढ, सुलभा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रत्येक विशिष्ट उद्योगासाठी व्हेंडर पार्क, कामगारांना स्वस्त घरे, पुरेसे पाणी व्यवस्थापन आदी मुलभूत समस्यांकडे राज्यकर्ता आणि विरोधी पक्ष विधानसभेत किंवा लोकसभेत एकत्रित पणे गुणात्मक व्हिजन मिशन घेऊन उद्योगस्नेही, कामगार स्नेही धोरण घेत नाही, तोपर्यंत एकमेकाला दोष द्यायचे, एकमेकाच्या विरोधात रस्त्यावर यायचे घोषणा बाजी निषेध करायचे पण उपयोग काय होणार, त्यापेक्षा उद्योगाचे स्थलांतर का होत आहे, आम्ही काय केले पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनी तज्ञ लोकांना एकत्र करून अभ्यासगट नेमावा, राज्य सरकारने महाराष्ट्र विकसित करण्यासाठी मेहनत घ्यावी, महाराष्ट्र विकसित झाला तर विकसित भारत निर्माण होईल. (migration of IT industry)
क्रांतीकुमार कडुलकर – पत्रकार पिंपरी चिंचवड
हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक