Thursday, December 5, 2024
Homeराजकारणतुकाराम मुंढेंवर स्मार्ट सिटीत 20 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

तुकाराम मुंढेंवर स्मार्ट सिटीत 20 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

(प्रतिनिधी) : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये 20 कोटींचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी मर्जितल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिला, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

    “तुकाराम मुंढे यांनी इतर दोन अधिकाऱ्यांसोबत मिळून  पदाचा गैरवापर केला. त्यांनी जबरदस्तीने 20 कोटी रुपये ट्रान्सफर केले”, असं संदीप जोशी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

   ‘आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. त्यांनी मला शहाणपण शिकवू नये’, अशा शब्दात महापौर जोशी यांनी मुंढे यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्यांनी तुकाराम मुंढेंवर घोटाळ्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली.

संबंधित लेख

लोकप्रिय