Manoj jarange Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आवाहन मराठा बांधवांना केले होते. आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला नवे आवाहन केले आहे.
अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आपली भूमिका बदलली आहे. जरांगे पाटल यांनी आपण लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही अशी भुमिका आता घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले की, ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा, मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही. राजकारणाच्या नादात मी माझी जात हरू देणार नाही. पण या आव्हानावर उमेदवार देता येणार नाही. अपक्ष उमेदवारही देता येणार नाही. अशी भूमिका जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीविषयी जाहीर केली. या घोषणेनंतर आता मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेतून माघार घेतली आहे. मात्र त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे पाटील यांनी आम्ही 112 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढणार आहोत. तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी झाली नाही तर आताच विधानसभेची तयारी करायची. असेही आवाहन त्यांनी केले. तसेच लोकसभेसाठी मराठा समाज अपक्ष उमेदवारही देणार नाही. असेही स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातून निवडणूक लढवण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. जनतेने त्यांची मते जरांगेंना लिहून पाठवली. पण कार्यकर्ते समाजातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले नसल्याची खंत जरांगेंनी बोलून दाखवली.


हे ही वाचा :
CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा
मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर
ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार
बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध