Friday, December 27, 2024
Homeग्रामीणआंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 3 गावांत ग्रंथालये सुरू

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 3 गावांत ग्रंथालये सुरू

आंबेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी बहुल भागातील 3 गाावांत ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. ज्या भागात प्राथमिक सुविधांची वानवा आहे, अश्या ठिकाणी आज ही वाचन चळवळ उभी राहत आहे.

आपटी ता.आंबेगाव जि. पुणे या दुर्गम गावात जेथे रस्त्याची, पाण्याची सुविधा अजुन व्यवस्थित पोहचलेली नाही. अशा या गावातील युवकांच्या ग्राम विकास समितीच्या पुढाकाराने नवीन ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

नाव्हेड गावात देखील युवकांच्या पुढाकारातून ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयासाठी वेगळी इमारत देखील उभारण्यात आलेली आहे. फुलवडे येथे देखील ग्रंथालय सुरू करण्यात आलेलं असून पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

लोकसहभागातून ग्रंथालयांत जमा केलेली पुस्तके सर्वांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ग्रंथालयाच्या बरोबरच सार्वजनिक वाचनालय ही सुरू करण्यात येणार असुन त्यात ग्रामस्थांना, युवक – युवतींना व विद्यार्थ्यांना वाचनासाठी दररोजची वर्तमानपत्रे, विविध मासिके, त्रैमासिके, वार्षिक अंक हे देखील वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

ही ग्रंथालये सुरू करण्यासाठी ज्ञानदीप वाचन चळवळीचे महेश जगताप, रविंद्र वायाळ व विजय केंगले यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शहीद राजगुरु ग्रंथालयाचे अशोक जोशी, राजु घोडे व अशोक पेकारी व आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, अनिल सुपे, अर्चना गवारी तसेच आपटी, नाव्हेड, फुलवडे येेथील नागरिकांनी स्थानिक संयोजन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय