फेरीवाल्यांचा ‘ग” प्रभागावर मोर्चा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पिंपरी-चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी व स्टॉल धारकांना स्टॉलधारकावर अन्यायकारक कारवाई करण्यात येत आहे, कोरोनामुळे भयानक बेरोजगारी आहे, जे रोजगार आहेत ते टिकत नाहीत अशातच यांचा रोजगार हिरावून घेतला तर फार मोठा उद्रेक होईल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पिंपरी चिंचवड मनपाचे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयावर आज (दि.११) मोर्चा काढण्यात आला होता. ग क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांचेशी चर्चा करण्यात आली. तसेच मागण्याचे निवेदन महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना देण्यात आले.
प्रा.डॉ.मेघना भोसले यांना नॅशनल वूमेन्स एक्सलन्स अवॉर्ड
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, स्वीकृत सदस्य संतोष बारणे, आकाश बारणे, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, लक्ष्मण शेरखणे, सलीम डांगे, राजेश माने, नवनाथ जगताप, कमल लष्करे, अस्मिता होळकर, राधा कांबळे, अशोक जाधव, उत्तम जाधव, आशा बंडगर, तय्यब शेख, मनीषा सूर्यवंशी, राकेश अग्रवाल, मंगल सागर, बाळू गायकवाड, राजेश जाधव आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील नियुक्त झाल्यापासून शहरातील फेरीवाल्यांवर फार मोठा अन्याय होत आहे, एकीकडे शहराच्या महापौर फेरीवाल्यांवर कारवाई करा असं वारंवार आदेश देत आहेत, त्यामुळे त्यामुळे शहरात गरीबानी जगायचं का नाही ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला नाही तर फार मोठे तीव्र आंदोलन होईल, असेही नखाते म्हणाले.
चिखली प्राधिकरण येथे आरोग्य शिबीर व गरजूंना किराणा वाटप
डांगे चौक, काळेवाडी फाटा, डी मार्ट, तापकीर चौक आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. महापालिका अधिकारी आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स दबाव टाकून त्यांना भयभीत केले जात आहे. गुन्हेगाराप्रमाणे फेरीवाल्यांना वागणूक दिली जाते हे अत्यंत चुकीचे कारवाई थांबली नाही तर फार मोठा संघर्ष होईल आणि फेरीवाल्यांचा उद्रेक होईल, असे नखाते म्हणाले.
सलीम डांगे म्हणाले, की हातगाडी चालू नसताना घराच्या समोर असलेल्या हातगाड्या सुध्दा उचलून नेल्या जात आहेत आणि एकाच ठिकाणी कारवाई केली जात आहे. विशिष्ट ठराविक ठिकाणीच कारवाई होते आणि ठराविक ठिकाणी कारवाई केली जात नाही.
– क्रांतिकुमार कडुलकर
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
अर्थसंकल्प : शेतकऱ्यांची घोर निराशाच… अधिक तरतुदींची अपेक्षा होती – शेतकरी नेते डॉ. अजित नवले