Home ताज्या बातम्या Lek Ladki scheme : राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल...

Lek Ladki scheme : राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Lake Ladki scheme launched in state, girls get Rs 1 lakh 1 thousand

मुंबई, (दि. ४) : मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. Lek Ladki scheme

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरित करण्यांत आले याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यांत येत आहे.

आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यांत येत असून पात्र लाभार्थीनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्‍या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

हे ही वाचा :

शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

…तर आम्ही भाजप सोबत जाऊ, उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी तीन उमेदवार जाहीर, “हे” आहेत तीन उमेदवार

भाजपला आणखी एका बड्या नेत्याचा रामराम

मोठी बातमी : Tata motors चे दोन कंपन्यात विभाजन होणार

Dhule : धुळे पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D

Amravati : अमरावती पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

MESCO पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती; आजच करा अर्ज!

Exit mobile version