Home ताज्या बातम्या Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती...

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर Ladki Bahin Yojana: When will dear sisters get their December installment?

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्ज छाननीबाबत आलेल्या वृत्तानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, अर्जांची पुन्हा छाननी होणार नसल्याचे स्पष्ट करत राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हा गोंधळ दूर केला आहे.

आदिती तटकरे यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी याआधीच योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. नव्याने छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. अर्जांमध्ये काही तक्रारी समोर आल्या आहेत, पण त्यावर निर्णय घेणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे.”  

तटकरे यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा मी महिला व बालकल्याण मंत्री होते, तेव्हा लाभार्थ्यांना निकषांनुसारच लाभ देण्यात आले. अर्जांमध्ये काही त्रुटी असल्या तरी त्या अर्जांचा पुनर्विचार करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.”

लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना निकषांत बसत नसतानाही प्रतिमहिना 1500 रुपये दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्या संदर्भात आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचा विचार होणार असल्याचे फडणवीस यांनी सूतोवाच केले होते.

Ladki bahin Yojana

हे ही वाचा :

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

Exit mobile version