Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड"ख्वाब" प्रकल्पाचे उद्घाटन मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांच्या हस्ते

“ख्वाब” प्रकल्पाचे उद्घाटन मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांच्या हस्ते

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : ‘ख्वाब’ हा उम्मीद कम्युनिटी सेंटरचा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड येथे उदघाटन करण्यात आले.

समाजातील उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी फॅशन डिझायनिंग, टेलरिंग, संगणक साक्षरता, आर्थिक शिक्षण आणि बुटीक व्यवस्थापन यांसारख्या विविध प्रकारच्या कौशल्य – निर्मिती हे ख्वाबचे उद्दिष्ट आहे.

प्रकल्पाचे उद्घाटन मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा व मार्गदर्शन प्रमुख पाहुणे आशा भट्ट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सपना पंडित प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी, जय मिश्रा उम्मीद सेंटरचे कार्यकारी अधिकारी होते. तसेच प्रशिक्षण साठी येणाऱ्या महिला व इतर मान्यवर उपस्थित होते.

महिलांना त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी असलेले हे पहिले पाऊल आहे. सशक्तीकरणाच्या या प्रेरणादायी प्रवासात व त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होईल.

संबंधित लेख

लोकप्रिय