Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाSFI आक्रमक : 'कमवा व शिका' मागेल त्याला देण्याची मागणी

SFI आक्रमक : ‘कमवा व शिका’ मागेल त्याला देण्याची मागणी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी स्व. वसंतराव काळे स्वाभिमान शिक्षण योजना (कमवा व शिका) योजनेत मागेल त्या विद्यार्थ्याला काम देण्यात यावे. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. SFI Aggressive : Demands to give to those who ask for the Earn and Learn scheme

Earn and Learn scheme

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे मुळात मराठवाड्याचे मागासलेपण लक्षात घेऊन येथील गोरगरीब, कष्टकारी, शेतकरी, कामगार यांच्या पुढच्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थापन झाले. आज विद्यापीठात शिकत असणारे अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेत असलेल्या पहिल्या पिढीतील आहेत. मराठवाड्यांचे मागासलेपण आजही कायम आहे. 

मराठवाड्यातील खेड्यापाड्याचे विद्यार्थी आजही शहरात येऊन स्व:खर्चांने शिक्षण पुर्ण करू शकत नाहीत. विद्यापीठातील कुठल्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणामुळे सुटू नये याची काळजी विद्यापीठाने घ्यावी. ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या कुटुंबाची मुले-मुली या योजनेत सहभागी होणार नाहीत, त्यामुळे सर्व गरजू विद्यार्थ्यांना कमवा व शिका मध्ये काम देण्यात यावे, अशी मागणी एसएफआय ने केली आहे.

Earn and Learn scheme

निवेदन देतेवेळी विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठातील सुरक्षा रक्षकासोबत विद्यार्थ्यांचा संघर्ष देखील झाला. यावेळी SFI च्या राज्य सचिवमंडळ सदस्य पल्लवी बोरडकर, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा बल्लाळ, गणेश अलगुडे, अरुण मते, कृष्णा रकटे, मुनिर सय्यद, प्रकाश वाव्हळे, नोबेल हजारे, प्रदीप चव्हाण, प्रिया झरे व विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी 

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज   

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती  

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज ! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती

SFI Aggressive : Demands to give to those who ask for the Earn and Learn scheme
संबंधित लेख

लोकप्रिय