Thursday, December 5, 2024
Homeराजकारणकेरळ : DYFI कार्यकर्ते अब्दुल रहमान यांची या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली हत्या

केरळ : DYFI कार्यकर्ते अब्दुल रहमान यांची या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली हत्या

केरळ : केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील  कन्हनगड येथील डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे कार्यकर्ते अब्दुल रहमान (वय 29) यांची बुधवारी रात्री मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली.

डीवायएफआय केंद्रीय कार्यकारी समितीने या तरुण कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला. तो आपल्या गर्भवती पत्नीला डॉक्टरकडे दाखविण्यासाठी काही पैसे आणण्यासाठी आपल्या मित्रांच्या घरी गेला होता. वाटेत मुस्लिम लीगच्या गुंडांनी त्याला रोखले आणि त्याच्यावर वार केले. सोबत असलेल्या सुहैबवरही हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरएसएस सतत डीवायएफआय च्या तरुण कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप डीवायएफआय ने केला आहे. 

डीवायएफआयने या दहशतवादाच्या तीव्रतेचा निषेध केला आहे. डीवायएफआय ने म्हटले आहे की, कॉम्रेड्सवर शारीरिक हल्ले करून कोणीही त्यांना राजकीय निष्ठेपासून रोखू शकणार नाही.

केरळ मधील लाखो मुस्लिम तरुण डीवायएफआय मध्ये कार्यरत आहेत. मुस्लिम लीग आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या मूलतत्ववादी संघटनांच्या विरोधात डीवायएफआय चा काही दशके व्यापक जनजागरण मोहीम सुरू असल्याचेही म्हटले आहे.

केरळच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित डाव्या आघाडीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर युवा कार्यकर्त्यांना एकटे गाठून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही म्हटले आहे.

जशास तसे उत्तर देणाऱ्या डीवायएफआय संघटनेच्या कासारगोड येथील सर्व कार्यकर्त्यांंनी संयम पाळावा, असे आवहान राष्ट्रीय अध्यक्ष मोहमद रियाज, राष्ट्रीय सचिव अभय मुखर्जी यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय