Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

पिंपरी चिंचवड : शाहूनगर येथे कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळ आयोजित १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.दिगंबर ढोकले होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक आणि माजी नगरसेवक महेश चांदगुडे, माजी उपमहापौर केशव घोळवे, शैलेश वांजरे, संदीप थोरात, संदीप चव्हाण, भगवान मुळे, नवनाथ पवार, वनिता एकनाथ पवार, दिपाली कारंजकर तसेच आधार महिला मंडळाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.

प्रा.दिगंबर ढोकले यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना उद्याचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया चांदगुडे यांनी केले तर आभार दिपाली कारंजकर यांनी मानले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय